आम्हाला नेहमी भेटायला येणारा अजून एक अत्यंत गोड पक्षी म्हणजे नर्तक. दिसायला अगदी चिमणीसारखा, फक्त याची शेपटी वर उचललेली असते. डोक्यावर रांगोळी काढावी तशा पांढऱ्या रेषा असतात. दिसायला साधा, पण जादुई पंखा असलेला हा नर्तक अतिशय मनोवेधक नृत्य करत असतो आणि नृत्यासोबत असते त्याचे मंजुळ गाणे.
अगदी वैशिष्ट्यपूर्ण असा कॉल!
याचा कॉल ऐकू आला की मी खिडकीत जाऊन कितीतरी वेळ पाहात राहायची. गोंडस, गोजिरवाणा असा हा पक्षी, कितीही साधा दिसत असला त्याच्या मधुर कॉलमधून याची नेहमी आनंदी वृत्ती लगेचच लक्षात येते. काही वेळा मात्र चक-चक असा कर्कश्श आवाज देखील काढत असतो.
याची लांबी साधरण १२ ते २१ सेंटीमीटर इतकी असते. शरीर पूर्ण काळे नसते तर किंचित तपकिरी आणि राखी रंगाचे असते. पोटाचा, मानेचा रंग पांढरा असतो. डोक्यावर रांगोळीने काढाव्या अशा तीन चार रेषा असतात. भुवया देखील पांढऱ्या रंगाच्या असतात. शेपटीमधली दोन पिसे तपकिरी रंगाची असतात. गाताना तो आपले पंख मोरासारखे पसरतो आणि अक्षरशः मोजून लावली अशी त्याची शेपटी जपानी पंख्यासारखी पसरते. गाण्याच्या लयीप्रमाणे ती शेपटी बंद - उघडी होत असते. शेपटीच्या पंखांवर छानशी नक्षी देखील असते.
हा पक्षी चिमणीसारखाच चपळ असतो. एका जागी शांत बसलाय असे आढळत नाही. सारखे इथून तिथे आणि तिथून इथे असे त्याचे चाललेले असते. ही हालचाल एखाद्या नृत्याप्रमाणे दिसते. म्हणूनच याला नर्तक असे म्हटले जाते. काहीजण याला नाचरा असेही म्हणतात. सर्वसामान्यपणे झाडेझुडपे, जंगलात, बागेत आढळतो.
हा नेहमी जोडीमध्ये असतो. याला माशीपकड्या असेही म्हटले जाते. हा पक्षी सर्व प्रकारच्या माशा, डास, किडे पकडून खात असतो. याचे शास्त्रीय नाव आहे ऱ्हिपिड्युरा आल्बोग्युलॅरीस (Rhipidura albicollis).
याचा विणीचा हंगाम असतो मार्च ते ऑगस्ट. झाडाच्या फांद्यांच्या खाचांमध्ये घरटे बांधतो. गवत, काड्या, धागे जमवून हा पक्षी आपले सुरेख वाटीसारखे घरटे बांधतो. बाहेरून मात्र कोळीष्टके लावलेली असतात. मादी बहुदा तीन अंडी घालते.
याला इंग्रजीमध्ये फॅनटेल असे म्हणतात ते त्याच्या पंख्यासारख्या शेपटीमुळे. यात अनेक प्रकार आहेत. आमच्याकडे मात्र पांढऱ्या मानेचा नाचरा येत असतो.
अगदी वैशिष्ट्यपूर्ण असा कॉल!
![]() |
उंच शेपटीची चिमणी |
याचा कॉल ऐकू आला की मी खिडकीत जाऊन कितीतरी वेळ पाहात राहायची. गोंडस, गोजिरवाणा असा हा पक्षी, कितीही साधा दिसत असला त्याच्या मधुर कॉलमधून याची नेहमी आनंदी वृत्ती लगेचच लक्षात येते. काही वेळा मात्र चक-चक असा कर्कश्श आवाज देखील काढत असतो.
![]() |
डोक्यावर नैसर्गिक रांगोळी |
हा पक्षी चिमणीसारखाच चपळ असतो. एका जागी शांत बसलाय असे आढळत नाही. सारखे इथून तिथे आणि तिथून इथे असे त्याचे चाललेले असते. ही हालचाल एखाद्या नृत्याप्रमाणे दिसते. म्हणूनच याला नर्तक असे म्हटले जाते. काहीजण याला नाचरा असेही म्हणतात. सर्वसामान्यपणे झाडेझुडपे, जंगलात, बागेत आढळतो.
हा नेहमी जोडीमध्ये असतो. याला माशीपकड्या असेही म्हटले जाते. हा पक्षी सर्व प्रकारच्या माशा, डास, किडे पकडून खात असतो. याचे शास्त्रीय नाव आहे ऱ्हिपिड्युरा आल्बोग्युलॅरीस (Rhipidura albicollis).
याचा विणीचा हंगाम असतो मार्च ते ऑगस्ट. झाडाच्या फांद्यांच्या खाचांमध्ये घरटे बांधतो. गवत, काड्या, धागे जमवून हा पक्षी आपले सुरेख वाटीसारखे घरटे बांधतो. बाहेरून मात्र कोळीष्टके लावलेली असतात. मादी बहुदा तीन अंडी घालते.
याला इंग्रजीमध्ये फॅनटेल असे म्हणतात ते त्याच्या पंख्यासारख्या शेपटीमुळे. यात अनेक प्रकार आहेत. आमच्याकडे मात्र पांढऱ्या मानेचा नाचरा येत असतो.
फोटो व व्हिडिओ: सुजाता बाबर
No comments:
Post a Comment