आम्ही नवीन जागेत रहायला आलो तेव्हा मागच्या पडीक जमिनीमध्ये काही झाडे लावली. जमीन सिमेंट आणि दगडांनी खूप खराब झालेली होती. साफ करून अशी झाडे लावली जिथे भरपूर पक्षी येतील. यात तुतीचे झाड खूप महत्त्वाचे. यामुळे तुती खायला खूप पक्षी येतात. आमच्या आसपासच्या घरांमध्ये आंब्याची खूप झाडे आहेत आणि उंच दाट निलगिरीची झाडे आहेत. त्यामुळे पक्षी आले तरी या उंच आणि दाट झाडांमध्ये लपून जात. हळद्या हा पक्षी अतिशय पिवळा धम्मक.
याचे इंग्रजी नाव म्हणजे गोल्डन ओरिओल. अगदी सोन्यासारखा पिवळा आणि गुलाबी चोच म्हणजे जणू काही कोणीतरी मेकअप करून पाठवावे इतका सुंदर पक्षी. सुरुवातीला दाट झाडांमध्ये फक्त पिवळ्या रंगाच्या छटा दिसायच्या. अगदी झलक दिसली तरी मला आनंद व्हायचा.
आमचे तुतीचे झाड मोठे झाले आणि पक्षांची जणू मांदियाळी वाटावी असे ते झाड पक्ष्यांनी बहरून जायचे. हळद्या देखील यायला लागला. पण फोटो काढण्यासाठी कॅमेराचा जरा जरी आवाज झाला तरी उडून जायचा. त्यामुळे बरेचदा खिडकीच्या काचेतून फोटो घ्यावे लागायचे. पण हळूहळू तुती खाण्यामध्ये दंग झालेल्या हळद्याला मला टिपता येऊ लागले.
फोटो काढण्यापेक्षा मी त्याला पाहण्यातच गुंग होऊन जात असे. हा आपल्याकडे दिसणारा सामान्य पक्षी.
जितका सुंदर तितका त्याचा आवाज चिरका, एकसुरी. पण अगदी विशिष्ट आवाज. अगदी मधुर नसला तरी वैशिष्ट्यपूर्ण! भारतात दिसणारा हळद्या हा स्थानिक पक्षी आहे. पण इतर अनेक देशांमध्ये स्थलांतरित होणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. मराठीत हळद्या किंवा पिलक अशा नावांनी ओळखला जातो. शास्त्रीय नाव आहे Oriolus oriolus.
बहुदा हे पक्षी जोडीमध्ये आढळतात. नर हा गडद पिवळा आणि पंख काळे असतात. तसेच डोळ्याखाली काजळ घातल्यासारखी पट्टी असते. मादी किंचित फिक्या पिवळ्या रंगाची असते. फुलांमधला मध, फळे आणि किडे हे याचे मुख्य अन्न. एप्रिल ते जुलै हा विणीचा हंगाम असतो. घरटे गवताचे आणि लहानसेच असते. एका वेळी २ ते ३ अंडी घालतात. उबवणीचा काळ १५ ते १८ दिवसांचा असतो. सगळे काम नर आणि मादी मिळून करतात. पिल्ले सुरुवातीचे १५ - २० दिवस घरट्यात राहतात. हळूहळू बाहेर पडतात. पिल्लाना “मोठे” व्हायला एक वर्ष लागते.
उंचीला ८ ते नऊ इंच असतो आणि वजन असते अवघे २० ते २८ ग्रॅम. डोळे गडद लाल असतात. याचे पंख साधारण १७ ते १८ इंच पसरतात. याची झेप अगदी थेट आणि सरळ असते. दिवसा यांची चलबिचल चाललेली असते. बिया इकडे तिकडे वाहून नेण्यामध्ये या पक्ष्याची मदत होते. बहिरी ससाणा, गरुड अशा प्रकारचे शिकारी पक्षी हे हळद्याचे शत्रू. याचे आयुष्य साधारण ९ ते १० वर्षांचे असते.
नाशिकच्या आसपास पक्षी निरीक्षण करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे कुठेही गेले तरी हळद्या हमखास दिसतो. .
फोटो: सुजाता बाबर
पिवळ्या आणि गुलाबी रंगाची उधळण |
![]() |
गडद रंगाचा नर |
फोटो काढण्यापेक्षा मी त्याला पाहण्यातच गुंग होऊन जात असे. हा आपल्याकडे दिसणारा सामान्य पक्षी.
किंचित फिक्या रंगाची मादी |
जितका सुंदर तितका त्याचा आवाज चिरका, एकसुरी. पण अगदी विशिष्ट आवाज. अगदी मधुर नसला तरी वैशिष्ट्यपूर्ण! भारतात दिसणारा हळद्या हा स्थानिक पक्षी आहे. पण इतर अनेक देशांमध्ये स्थलांतरित होणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. मराठीत हळद्या किंवा पिलक अशा नावांनी ओळखला जातो. शास्त्रीय नाव आहे Oriolus oriolus.
बहुदा हे पक्षी जोडीमध्ये आढळतात. नर हा गडद पिवळा आणि पंख काळे असतात. तसेच डोळ्याखाली काजळ घातल्यासारखी पट्टी असते. मादी किंचित फिक्या पिवळ्या रंगाची असते. फुलांमधला मध, फळे आणि किडे हे याचे मुख्य अन्न. एप्रिल ते जुलै हा विणीचा हंगाम असतो. घरटे गवताचे आणि लहानसेच असते. एका वेळी २ ते ३ अंडी घालतात. उबवणीचा काळ १५ ते १८ दिवसांचा असतो. सगळे काम नर आणि मादी मिळून करतात. पिल्ले सुरुवातीचे १५ - २० दिवस घरट्यात राहतात. हळूहळू बाहेर पडतात. पिल्लाना “मोठे” व्हायला एक वर्ष लागते.
सौंदर्याची खाण |
उंचीला ८ ते नऊ इंच असतो आणि वजन असते अवघे २० ते २८ ग्रॅम. डोळे गडद लाल असतात. याचे पंख साधारण १७ ते १८ इंच पसरतात. याची झेप अगदी थेट आणि सरळ असते. दिवसा यांची चलबिचल चाललेली असते. बिया इकडे तिकडे वाहून नेण्यामध्ये या पक्ष्याची मदत होते. बहिरी ससाणा, गरुड अशा प्रकारचे शिकारी पक्षी हे हळद्याचे शत्रू. याचे आयुष्य साधारण ९ ते १० वर्षांचे असते.
नाशिकच्या आसपास पक्षी निरीक्षण करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे कुठेही गेले तरी हळद्या हमखास दिसतो. .
फोटो: सुजाता बाबर
No comments:
Post a Comment