आमच्या खिडकीबाहेर तुतीचे झाड होते. काही कारणाने त्याला कीड पडली आणि ते जळून गेले. त्या झाडाने मला बरेच काही शिकवले. त्यावर एवढे वेगवेगळे पक्षी यायचे की अनेकदा एकाच वेळी वेगवेगळे कॉल्स ऐकू यायचे आणि गोंधळ उडायचा. एकदा अशीच काम करीत बसले होते. आणि मागून अगदी नाजूक असा चिवचिवाट ऐकू आला. इतका नाजूक की चिमणी नक्कीच नव्हती. कुतूहलाने पाहायला गेले तर गर्द पानांच्या आड निळसर रंग दिसला. मला आधी वाटले काहीतरी कापड किंवा प्लास्टीकची पिशवी अडकली असावी. पण नाही, तो तर सुंदर अद्भुत अशा निळ्या रंगाचा पक्षी होता.
मी हा पक्षी प्रथमच पाहत होते. मला नाव माहीत नव्हते. मग पुस्तकं बाहेर काढली. हा तर नीलांग. कॅमेरा आणेपर्यंत उडून देखील गेला. एखाद्या गूढ सिनेमासारखं वाटलं. अगदी थोडा वेळ दर्शन देऊन निघून गेला. पण गंमत म्हणजे पुन्हा दुसऱ्या दिवशी तो आला. आणि एखादा पक्षी तुतीच्या झाडावर आला की हमखास परत येत असे हे मला अनुभवाने समजले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी कॅमेरा अगदी सज्ज ठेवला होता. दुसऱ्या दिवशी तो ठरल्याप्रमाणे आला. बराच वेळ थांबला. मला त्याचे पुष्कळ फोटो काढता आले आणि व्हिडीओ देखील घेता आला.
नीलांग म्हणजे व्हर्डीटर फ्लायकॅचर. याचे शास्त्रीय नाव आहे, Eumyias thalassina. याला मोरकंठी लिटकुरी असेही नाव आहे. साधारण १५ सेंटीमीटर लांब. नर हा थोडासा गडद हिरवट निळ्या रंगाचा असतो, तसेच त्याची चोच व डोळ्याखाली काळा रंग असतो. मादी फिक्या रंगाची असते, शिवाय अंगावर राखाडी छटा असते. हवेत उडणारे कीटक पटकन पकडायची सवय असते म्हणून याला फ्लायकॅचर असे म्हणतात. हा पक्षी इतका चंचल असतो की दिसला की दुसऱ्या मिनिटाला नाहीसा होतो. बहुदा म्हणूनच याला गूढ पक्षी म्हणत असावेत.
एप्रिल ते जुलै हा याचा प्रजनन काळ. हे पक्षी झाडांच्या मोकळ्या मुळ्यांमध्ये किंवा पडक्या भिंतीच्या आतमध्ये घरटे बांधतात. एका वेळी ३ ते ४ अंडी देतात. अर्थातच सगळी देखभाल नर आणि मादी करतात.
हा पक्षी दिसायला अतिशय मनमोहक असतो. हिरवट आणि गर्द निळा रंग आणि काजळ घातल्यासारखे डोळे त्यामुळे कुठूनही लक्ष वेधून घेतो. अनेकदा निळ्या रंगामुळे नीलांग पक्ष्याला चुकून नीलपरी, जांभळी लिटकुरी समजले जाते.
परंतु नीलपरी, जांभळी लिटकुरी या पक्ष्याच्या खालचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो आणि मानेला नेकलेस सारखा काळा रंग असतो. याचे वास्तव्य भारतात आणि जवळपास सगळ्या आशियाई देशांमध्ये सापडतो. साधारणपणे खुल्या रानात किंवा छतावर हा पक्षी दिसतो. पक्ष्यांमध्ये मोर हा काही फक्त निळ्या रंगाचा मनोहर पक्षी नाही तर नीलांग देखील मोरासारखा नयनरम्य दर्शन देणारा पक्षी आहे. तुम्ही पाहिला की तुम्हाला नक्की पटेल.
फोटो आणि व्हिडिओ : सुजाता बाबर
![]() |
नर नीलांग |
मी हा पक्षी प्रथमच पाहत होते. मला नाव माहीत नव्हते. मग पुस्तकं बाहेर काढली. हा तर नीलांग. कॅमेरा आणेपर्यंत उडून देखील गेला. एखाद्या गूढ सिनेमासारखं वाटलं. अगदी थोडा वेळ दर्शन देऊन निघून गेला. पण गंमत म्हणजे पुन्हा दुसऱ्या दिवशी तो आला. आणि एखादा पक्षी तुतीच्या झाडावर आला की हमखास परत येत असे हे मला अनुभवाने समजले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी कॅमेरा अगदी सज्ज ठेवला होता. दुसऱ्या दिवशी तो ठरल्याप्रमाणे आला. बराच वेळ थांबला. मला त्याचे पुष्कळ फोटो काढता आले आणि व्हिडीओ देखील घेता आला.
नीलांग म्हणजे व्हर्डीटर फ्लायकॅचर. याचे शास्त्रीय नाव आहे, Eumyias thalassina. याला मोरकंठी लिटकुरी असेही नाव आहे. साधारण १५ सेंटीमीटर लांब. नर हा थोडासा गडद हिरवट निळ्या रंगाचा असतो, तसेच त्याची चोच व डोळ्याखाली काळा रंग असतो. मादी फिक्या रंगाची असते, शिवाय अंगावर राखाडी छटा असते. हवेत उडणारे कीटक पटकन पकडायची सवय असते म्हणून याला फ्लायकॅचर असे म्हणतात. हा पक्षी इतका चंचल असतो की दिसला की दुसऱ्या मिनिटाला नाहीसा होतो. बहुदा म्हणूनच याला गूढ पक्षी म्हणत असावेत.
![]() |
सुंदर निळा रंग आणि काजळ घातल्यासारखे डोळे |
एप्रिल ते जुलै हा याचा प्रजनन काळ. हे पक्षी झाडांच्या मोकळ्या मुळ्यांमध्ये किंवा पडक्या भिंतीच्या आतमध्ये घरटे बांधतात. एका वेळी ३ ते ४ अंडी देतात. अर्थातच सगळी देखभाल नर आणि मादी करतात.
हा पक्षी दिसायला अतिशय मनमोहक असतो. हिरवट आणि गर्द निळा रंग आणि काजळ घातल्यासारखे डोळे त्यामुळे कुठूनही लक्ष वेधून घेतो. अनेकदा निळ्या रंगामुळे नीलांग पक्ष्याला चुकून नीलपरी, जांभळी लिटकुरी समजले जाते.
![]() |
हिरव्या पानांमध्ये लपून राहणारा |
फोटो आणि व्हिडिओ : सुजाता बाबर
No comments:
Post a Comment